चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८ 

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे दि. १४  सप्टेंबर, २०२३ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांचे सभागृह, येथे आयोजित पुणे विभागाच्या प्रलंबित प्रकरणाच्या सुनावण्या प्रशासकीय व अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. पुढील स्थळ, दिनांक व वेळ नंतर कळविण्यात येईल

०२२-२४९२०८९७/९५/९४

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

(महाराष्ट्र शासन )

आज दिनांक १३ मे २०२२ रोजी,

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या नवनिर्वाचित  अध्यक्षा, मा. श्रीमती  सुसीबेन शहा, मा. सचिव, श्री. उदय जाधव (भा.प्र.से.) व आयोगाच्या  सदस्य मा. ॲड. निलिमा चव्हाण व श्रीमती शोभा शेलार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई यांनी शासकीय मुलींचे विशेष पुनर्वसन केंद्र, देवनार मुंबई येथे भेट दिली.

 मा. अध्यक्षा यांनी या  पुनर्वसन केंद्रातील मुलींच्या सर्व कक्षांची प्रत्यक्ष पाहणी केली, संस्थेतील मुलींची एकूण संख्या , त्यांचे साठी उपलब्ध सोयी सुविधा या बाबत विस्तृत माहिती घेतली.  सर्व मुलीं समवेत आपुलकी  व जिव्हाळ्याने संवाद साधला. त्यामुळें सर्व मुलींनी त्यांच्या सोबत स्वतः चे भावी आयुष्यातील त्यांचे धेय्य व स्वप्नाबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. बालकांच्या मनातले प्रश्न त्यांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला.

मा. अध्यक्षा ,सदस्य व इतर अधिकाऱ्यांनी संस्थे मध्ये दैनंदिन अडचणी बाबत विस्तृत माहिती घेतली. मा. अध्यक्षा यानी संस्थेचे गॅस व लाईट सुविधे बाबत कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही सर्वांना दिली. संस्थेतील मुलीनी अत्यंत प्रेमाने ,भावूक होऊन  काही क्षणात उत्स्फूर्त पणे सुंदर पेंटींग उपस्थीत सन्माननीय यांना भेट दिली.