मा. सदस्य, बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्र राज्य
श्रीमती सायली पालखेडकर वलय फाउंडेशनच्या अध्यक्षा व आदित्या एंटरप्रायसेस & साईदिप एंटरप्रायसेसच्या संचालिका असून मुख्यत्वे महिला सबलीकरण व लहान, निराधार, अनाथ बालकांच्यासाठी कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी स्वतः पुढाकार घेवून ग्रामीण व आदिवासी भागामध्ये विविध समाजोपयोगी सामाजिक उपक्रम राबविले आहेत. गरजू लोकांना अन्नधान्य, कपडे, शालेय साहित्य व गणवेश,शाळांमध्ये पाणी फिल्टर, अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. दुर्गम भागामध्ये आरोग्य तपासणी, रक्तदान, महिला स्वयंरोजगार व गृहउद्योग प्रशिक्षण, पालक समुपदेशन शिबिरे घेतले आहेत. त्या सातत्याने मध्यवर्ती तुरुंगातील कैदी महिलांचे समुपदेशन करून त्यांना आवश्यक साहित्य पुरवतात. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी मसाले, हळद, तिखट तयार करणे, पॅकिंग करणे व बाजारपेठ विक्री याबाबत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. त्यांच्या समाजकार्याबद्धल त्यांना नॅशनल कमिशन फॉर वुमन्स इंडिया कडून पुरस्कार देण्यात आला असून भारतीय पत्रकार संघाचा सावित्री गौरव राष्ट्रीय पुरस्कार, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय कर्तुत्वावान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार, मराठी पत्रकार संघाकडून उद्योजिका पुरस्कार, आपलं रुग्ण सेवा केंद्राकडून सामाजिक पुरस्कार, अखिल भारतीय पत्रकार संघाकडून स्वयंसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार,शक्तिमान महिला रत्न पुरस्कार, राणी दुर्गावती मातृत्व पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.