चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८ 

०२२-२४९२०८९४

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

(महाराष्ट्र शासन )
Chirag App
चिराग ऍप

आज दिनांक २० मे, २०२२ रोजी आयोगाच्या प्रशिक्षणाकरीता आयोगाचे मा. अध्यक्षा, श्रीम. सुशीबेन शाह, तसेंच श्रीम  नीलिमा चव्हाण,श्री सजय सेंगर, श्रीम. प्रज्ञा खोसरे, श्रीम. जयश्री पालवे, श्रीमती सायली पालखेडकर, श्री.चैतन्य पुरंदरे हे आयोगाचे सदस्यांसाठी आयोगाच्या कामकाजाबाबत  श्री. संतोष शिंदे, विधायक भारती माजी सदस्य, बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणामध्ये श्री. संतोष शिंदे यांनी आयोगाचे कामकाजा संदर्भात अत्यंत सोपे व सविस्तर असे बहुमूल्य मार्गदर्शन केले व त्यांचे बालकांच्या संरक्षणासाठी संदर्भात काम करताना आलेले मागील कार्य काळामधील इतर अनुभव ,कायदे, माहिती सर्वांसमोर मांडले. यामुळे नवीन नियुक्ती झालेले आयोगाचे मा. अध्यक्षा व सदस्य यांना बालकांचे हित जपणे, संरक्षण संदर्भात काम करण्यासाठी अधिक परिणामकारक काम करणे सुलभ होईल.