चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८ 

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे दि. १४  सप्टेंबर, २०२३ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांचे सभागृह, येथे आयोजित पुणे विभागाच्या प्रलंबित प्रकरणाच्या सुनावण्या प्रशासकीय व अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. पुढील स्थळ, दिनांक व वेळ नंतर कळविण्यात येईल

०२२-२४९२०८९७/९५/९४

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

(महाराष्ट्र शासन )

आज दिनांक १२ मे २०२२ रोजी, युवा चाईल्ड लाईन या सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधी सोबत बाल हक्क आयोग महाराष्ट्र राज्य चे अध्यक्षा, मा. सुशीबेन शहा आणि सदस्य सचिव, श्री. उदय जाधव (भा.प्र.से.), श्री. प्रमोद बाडगी, विधी सल्लागार, श्रीमती माधवी भोसले, प्र. प्रशासकीय अधिकारी , श्रीमती कल्पना खंबाईंत, परिविक्षा अधिकारी सोबत बैठक पार पडली.

प्रामुख्याने बालकांचे शोषणाचे मुद्दे आणि यंत्रणां याबाबत चर्चा करून पीडित मुलांना तात्काळ तक्रार दाखल करून घेणे बाबतची कार्यप्रणाली कशी असावी यावर चर्चा झाली.

काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांना मदत करणारी आपात्कालीन हेल्पलाईन 1098 बद्दल जाणून घेतल्याशिवाय मुलान प्रती संवेदनशील आणि बालस्नेही  वातावरण निर्मितीसाठी पुढील बैठक आयोजित केली.

यावेळी युवा संस्थेचे बाल अधिकारी वरिष्ठ कार्यकर्ते श्री. विजय खरात आणि युवा चालला इन मुंबई शहर केंद्र समन्वयक श्री जितेंद्र चौगले, यांनी बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा आणि सदस्यांना संविधान प्रत देऊन त्यांचे स्वागत केले.