चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८ 

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे दि. १४  सप्टेंबर, २०२३ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांचे सभागृह, येथे आयोजित पुणे विभागाच्या प्रलंबित प्रकरणाच्या सुनावण्या प्रशासकीय व अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. पुढील स्थळ, दिनांक व वेळ नंतर कळविण्यात येईल

०२२-२४९२०८९७/९५/९४

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

(महाराष्ट्र शासन )

दिनांक : २७ मे, २०२२ रोजी पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात बालहक्क संरक्षण आयोगाची सुनावणी मा. अध्यक्षा श्रीमती सुशीबेन शाह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सदर सुनावणीस आयोगाचे मा. सदस्य सचिव श्री. उदय जाधव (भा.प्र.से.) व मा. सदस्य, ऍड. नीलिमा चव्हाण, ऍड. जयश्री पालवे, ऍड. प्रज्ञा खोसरे, ऍड. संजय सेंगर, सौ. सायली पालखेडकर, श्री. चैतन्य पुरंदरे उपस्थित होते. सदर सुनावणी दरम्यान पुणे जिल्ह्यातील एकूण ३५ प्रकरणांवर आयोगाने सुनावणी घेऊन निवाडा केला. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात आयोग स्थापित झाले नव्हते, अनेक प्रकरणे प्रलंबित होती. त्यामुळे लवकरात लवकर सर्वप्रकरणी मागे लावण्याच्या बाल हक्क संरक्षण आयोगाचा प्रयत्न राहील.