चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८ 

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे दि. १४  सप्टेंबर, २०२३ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांचे सभागृह, येथे आयोजित पुणे विभागाच्या प्रलंबित प्रकरणाच्या सुनावण्या प्रशासकीय व अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. पुढील स्थळ, दिनांक व वेळ नंतर कळविण्यात येईल

०२२-२४९२०८९७/९५/९४

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

(महाराष्ट्र शासन )

दिनांक : २७-०७-२०२२ रोजी मा.अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली होती. सदर बैठकीत मा. सदस्य सचिव, श्री. उदय जाधव (भा.प्र.से.), आयोगाच्या मा. सदस्य ऍड. श्रीम. नीलिमा चव्हाण, ऍड. जयश्री पालवे, ऍड. संजय सेंगर, श्रीम. सायली पालखेडकर, श्री. चैतन्य पुरंदरे तसेच समर्थन स्वयंसेवी संस्थेचे श्रीम. हिंदळेप्रभ कर्व, श्रीमती नीलिमा काकड, श्री. रुपेश करव, व श्रीम. स्नेहा घरात उपस्थित होते. सदर बैठकीत दि. २३ जुलै,२०२२ रोजी महाराष्ट्र ट्रान्स व महामुंबई या वृत्तवाहिनी मध्ये छापून आलेल्या “राज्यात २२,७५१ बालमृत्यू” बातमी बाबत मा. अध्यक्षा यांनी आढावा घेतला व यासंदर्भात सर्व शासकीय यंत्रणांना सूचना देण्यात येणार असून, राज्यातील कोणतेही बालक कुपोषित राहू नये यासाठी आयोगामार्फत संबंधित सर्व विभागांना सूचित करण्यात येणार आहे.