दिनांक : २४ जून, २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या मा. अध्यक्षा श्रीम.ॲड. सुशीबेन शहा, मा. सचिव श्री. उदय जाधव (भा.प्र.से.), मा. सदस्य ॲड. निलिमा चव्हाण, मा. श्री. चैतन्य पुरंदरे व आयोगाचे अधिकारी-कर्मचारी, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथे आयोगाच्या मुंबई शहर व उपनगरातील प्रकरणांच्या सुनावणी करिता उपस्थित होते. सदर सुनावणी दरम्यान मा. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एकूण २७ प्रकरणांचा निवाडा करण्यात आला.