चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८ 

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे दि. १४  सप्टेंबर, २०२३ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांचे सभागृह, येथे आयोजित पुणे विभागाच्या प्रलंबित प्रकरणाच्या सुनावण्या प्रशासकीय व अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. पुढील स्थळ, दिनांक व वेळ नंतर कळविण्यात येईल

०२२-२४९२०८९७/९५/९४

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

(महाराष्ट्र शासन )

दि.०८ जुलै, २०२२ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची सुनावणी आयोगाच्या मान. अध्यक्षा, श्रीमती. सुशीबेन शाह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आयोगाचे मा. सदस्य ऍड. निलिमा चव्हाण, मा. श्री. चैतन्य पुरंदरे व मा. सचिव उदय जाधव (भा.प्र.से.) तसेच प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुंबई उपनगर क्षेत्रातील सुमारे ३१ सुनावण्या घेतल्या व आयोगातर्फे तक्रारदारांना न्याय द्यायचा प्रयत्न करून निवाडा करण्यात आला. तसेच यानंतर यावेळी दत्तक विधान क्षेत्र व बाल संरक्षण क्षेत्राशी संबंधित NGO च्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोगाने संवाद साधला. तसेच पॉक्सो, आरटीई, बाल हक्क भंग याबाबत तक्रारी वर सुनावणी संपन्न झाली. यासाठी पोलीस विभाग, शालेय शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.