चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८ 

Important Notice – Click here to view document
०२२-२४९२०८९४

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

(महाराष्ट्र शासन )
Chirag App
चिराग ऍप
महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग आणि चाइल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 'सेफ वेब फॉर चिल्ड्रन' या उपक्रमाच्या अनुषंगाने प्रशिक्षण कार्यशाळा काल इंटरनॅशनल हाऊस, मुंबई सेंट्रल येथे पार पडली
आज राज्याच्या महिला व बाल विकास विभाग या खात्याच्या मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकार केल्यानंतर मंत्री आदिती ताई तटकरे यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात आयोगाच्या सदस्या श्रीमती निलिमा चव्हाण व सहकाऱ्यांसोबत भेट घेऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या!
महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग आणि चाइल्ड फंड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सेफ वेब फॉर चिल्ड्रेन या उपक्रमाअंतर्गत शिक्षकांसाठी मुंबई पब्लिक स्कूल, CBSE येथे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारा आज वरळी, मुंबई येथील कार्यालयात पोक्सो व RTE अंतर्गत आयोगाकडे आलेल्या तक्रारींबाबत सुनावणी आयोजित करण्यात आली होती
आज अनेक सामाजिक संस्थांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र निसर्ग उद्यान येथे आयोजित केलेल्या Children Speak : A Commitment In Empowering Children's Voices या उपक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली
सिंधुदुर्ग एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात फार्मा क्षेत्रातील उद्योगांना प्राधान्य देऊन तेथील स्थानिक कोकणवासीयांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने आज महत्त्वपूर्ण बैठक उद्योग मंत्री श्री. उदय सामंत व शालेय शिक्षण मंत्री श्री. दिपक केसरकर यांच्या प्रमुख उस्थितीत रामटेक बंगला येथे पर पडली.
आज महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व पोलीस मुख्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पोक्सो व जे. जे. ॲक्ट व इतर बालकांशी निगडित कायद्यानंविषयी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती
आज महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग आणि होप फॉर द चिल्ड्रेन यांच्या वतीने पुणे विभागातील बालगृह व निरीक्षण गृहातील २०२४ शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे येथे माझ्या अध्यक्षीय उपस्थित आयोजित करण्यात आला होता
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग" व "महिला व बाल विकास आयुक्तालय व चाइल्डफण्ड" यांच्या संयुक्त विद्यमाने सेफ वेब फॉर चिल्ड्रेन (SAFE WEB FOR CHILDREN) कार्यक्रमाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री सन्माननीय Aditi Tatkare जी यांच्या हस्ते मुंबईचे पालकमंत्री सन्माननीय Deepak Vasant Kesarkar जी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
पनवेल येथे पार पडलेल्या राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या कामकाजाची सुनावणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या सभागृहात पार पडली. यावेळी शालेय शिक्षण विभागाशी संबंधित 21 प्रकरणे व महिला बालविकास विभागाशी संबंधित 8 प्रकरणे निकाली काढण्यात आली
आज, चाइल्डफंड इंडियाच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग (MSCPCR) कार्यालयात महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली
नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने सादर केलेल्या अंमली पदार्थ आणि पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी यावरील संयुक्त कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यासाठी (नंदुरबार) हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित
जे जे ऍक्ट च्या नियम 91 ( 1)( iii ) नुसार, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे "मुलांची सुधारणा व त्यांचे सामाजिक पुनर्मिलन / पुनर्भेट" या विषयाबाबतचे नियम तयार करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने सदर नियमांचा पहिला मसुदा (ड्राफ्ट) तयार करण्यात आलेला असून सदर मसुद्यावर चर्चा करण्यासाठी दिनांक 11 जून 2024 रोजी कॉन्फरन्स हॉल, क्वीन्स गार्डन, पुणे येथे दुपारी 12 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती
महाराष्ट्र कॉलेज येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मजलिसने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले
आज मंत्रालयात नवीन शैक्षणिक धोरण, पूर्व प्राथमिक कायद्यातील विविध तरतुदी आणि अल्पसंख्याक शाळांमध्ये EWS विद्यार्थ्यांचा प्रवेश या विषयांवर संबंधित अधिकाऱ्यानं समवेत बैठक पार पडली
मनाला सशक्त करणे, भविष्य घडवणे: inspirED नावाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, जिथे मी माझे विचार प्रतिबिंबित केले आणि चर्चा करणाऱ्या एका पॅनेलमध्ये सामील झालो
प्रियांक कानूनगो यांच्याशी अतिशय फलदायी भेट आणि तपशीलवार, माहितीपूर्ण चर्चा झाली. बालहक्कांच्या संरक्षणाविषयी सखोल ज्ञान सामायिक केले, विशेषत: काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या आणि कायद्याशी विरोधाभास असलेल्या मुलांबद्दल.
रश्मी फाउंडेशन आणि नेहरू नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ यांनी आयोजित केलेल्या ' छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची शिवजयंती ' या कार्यक्रमात मा. आमदार श्री. मंगेश कुडाळकर यांच्यासोबत सहभागी झाले
अरुणाचल प्रदेश बाल हक्क संरक्षण आयोगाच्या टीम ने आज महाराष्ट्र राज्य संरक्षण आयोगाच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली.
महिला व बाल विकास विभाग, मुंबई शहर आणि महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, दादर आगार यांच्या पुढाकाराने दादर एस. टी. स्थानकात स्तनदा माता आणि शिशुच्या सुविधेसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आले
आज ठाणे येथे शाळेला भेट देऊन पीडित मुलांच्या पालकांची भेट घेतली. त्यांना आश्वस्त केले की दोषींवर कठोर कारवाई होईल. यावेळी सर्व संबंधित अधिकारी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
महिला व बाल विकास विभागने एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत राष्ट्रीय बालिका दिवस २०२४ निमित्त 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' कार्यक्रमाचे आयोजन लोकमान्य टिळक म्यूनसिपल मेडिकल कॉलेज येथे केले होते.
आज सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांसमोर बेघरता हा गंभीर प्रश्न आणि त्यावर धोरणकर्त्यांची भूमिका यावर चर्चा केली.
बालहक्क संरक्षण आयोगाने पॉक्सो व बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांचा अमरावती विभागातील अकोला, अमरावती शहर व ग्रामीण, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी नागपूर येथे आढावा बैठकीचे आयोजन केले
नागपूर येथील इंडियन सोशल सर्विस युनिट ऑफ एज्युकेशन या संस्थेने बाल विवाह विरोधात जनजागृती करण्यासाठी व बाल विवाह मुक्त भारत घडवण्याच्या उद्देशाने लोकोपयोगी पिशव्या छापल्या.
बाल हक्क संरक्षण आयोगाने पॉक्सो व बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी नागपूर येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.