चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८ 

Important Notice – Click here to view document
०२२-२४९२०८९४

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

(महाराष्ट्र शासन )
Chirag App
चिराग ऍप
महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगा चा दि.15 व 16 फेब्रुवारी 2023 या दिवशी अहमदनगर येथे दौरा संपन्न झाला.
कोल्हापूर बार कौन्सिलला भेट दिली आणि "बालरक्षक" च्या आमच्या अनोख्या सहभागासाठी त्यांचा पाठिंबा मागितला, जो बालमित्र महाराष्ट्राचा च्या प्रकल्पाला बळ देईल.
आज सकाळी कोल्हापूर दौरा चे दुसऱ्या दिवशी सर्व WCD, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, आरोग्य, पोलीस विभाग यांची एकत्रित बैठक घेऊन #ChildFriendlyMaharashtra साठी आवश्यक सूचना दिल्या व चर्चा केली.
कोल्हापूर येथील शासकीय सायबर कॉलेज येथील सामाजिक कार्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना संबोधित केले. तसेच राज्य बालहक्क आयोगाच्या बालरक्षक या उपक्रमाबाबत माहिती देऊन यात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य श्री. दीपक भोसले यांनी स्वागत केले
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा दिनांक 28 व 29 मार्च 2023 या दोन दिवशी कोल्हापूर येथे #दौरा आयोजित करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची अध्यक्षा म्हणून मी श्री. दीपक पांडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला, बाल अत्याचार, प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य यांची घेतली
यांच्यासोबत आज आश्रय मुलांच्या निवारागृहाला भेट दिली CCDT
मा श्री दीपक केसरकर, मंत्री, शालेय शिक्षण यांच्या समवेत बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये खालील विषयांबाबत चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत आयोजित पोक्सो कायदा २०१२ व जे.जे. ॲक्ट २०१५ च्या परिणामकारक अंमलबजावणी बाबत आढावा घेण्यासंदर्भात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीताने करण्यात आली.
महाराष्ट्रातील बालकांना संरक्षण देणे आणि त्यांच्या हकांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असलेल्या महाराष्ट्र बाल हक्क आयोगाच्या विविध कार्यक्रमांच्या परिणामकारक अंमलबजावणी बाबत आयोगाच्या सदस्यांसोबत पुढील कामकाजाचे नियोजन करण्यासंबंधी बैठक पार पडली.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या आजच्या आढावा बैठकीची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली.
आज मुंबई विमानतळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि विमानतळावर प्रियदर्शिनी टॅक्सी सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा केली. विमानतळावर त्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत असलेल्या समस्यांबाबत चर्चा केली
मुंबई येथे महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची बैठक पार पडली. मजलिस या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींसोबत पार पडलेल्या बैठकीत मुंबई आणि कोंकण विभागात #POCSO आणि #Juvenile Justice कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला
आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिना निमित्त बेहराम पाडा, वांद्रे येथे काढण्यात आलेल्या बाल कामगार विरोधी जनजागृती रैली मधे सहभागी होत सदर आशयाची पत्रके दुकानांमध्ये जाऊन वाटली व या मोहिमेचा प्रसार करणारी स्टिकर गाड्यांवर लावण्यात आले
प्रियदर्शनी टॅक्सी सेवा, महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या सन्मानासाठी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मी सुरू केलेला उपक्रम. महिला चालकांची टीम काल मला भेटली आणि मुंबई विमानतळावर प्रियदर्शनी टॅक्सी काउंटर मिळवण्याचा प्रयत्न करण्याची विनंती केली.
आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिनानिमित्त कामगार आयुक्तालय कामगारभवन येथे बालकामगार विरोधात जनजागृती करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम ची सुरुवात करण्यात आली.उपस्थित सर्वांनी बालकामगार विरोधी मोहिमेत फलकावर स्वाक्षरी केली.
राजस्थान राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगामार्फत माऊंटअबू येथे आयोजित राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमांतर्गत डिजिटल स्पेसमध्ये बाल हक्कांना सुरक्षित करण्याबाबत झालेल्या चर्चा सत्रात सहभागी झाले
महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या नवनिर्वाचित मंत्री महोदया सन्माननीय अदिती तटकरे जी यांची आज भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच महिला व बालकांच्या विविध प्रश्नांविषयी विस्तृत चर्चा केली
नांदेड येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयात त्यांनी आयोजित केलेल्या लैंगिक संवेदना कार्यक्रमासाठी मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत ‘पोक्सो’ व बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद विभागात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले
मा. ना. अदिती तटकरे जी, मंत्री महिला व बाल विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर व उपनगर परिसरात सार्वजनिक खाजगी स्वरुपात डे केअर सेंटर सुरु करण्याबाबत आयोजित बैठकीत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने उपरोक्त विषयावर चर्चा करताना
मुंबई उच्च न्यायालया द्वारे आयोजित आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या बाल हक्क समिती, महाराष्ट्र न्यायिक अकादमीच्या महिला व बाल विकास विभाग यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रात विविध मान्यवरांसह प्रमुख उपस्थिती म्हणून सहभाग घेतला.
महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये बाधित कुटुंबातील अनाथ बालक व त्यांच्या नातेवाईक यांची भेट घेऊन सदर दुर्घटनेमध्ये शून्य ते अठरा वयोगटातील अनाथ झालेल्या 22 बालकांना संरक्षण देण्यासाठी विशेष बाब म्हणून महिला व बालविकास विभागाची बालसंगोपन योजना लागू करण्याबाबत बाबत आयोगामार्फत पाठपुरावा करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या विषयांवर बाल हक्क संरक्षण आयोगाच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्यातील बालकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी बाल हक्क संरक्षण आयोग कटिबध्द आहे. त्याच अनुषंगाने येणाऱ्या काळात या विषयीच्या योजना आखण्याबाबत चर्चा करण्यात आली
महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री सन्माननीय Aditi Tatkare जी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या झूम मीटिंग मध्ये महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने उपस्थित राहून विविध विषयांवर व बाल दिनी देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या बाबतीत चर्चा करण्यात आली
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त श्री. सुरज मांढरे यांची भेट घेऊन ECE मार्गदर्शक तत्वे तयार करताना बाल हक्क आयोग व या क्षेत्रात काम करणाऱ्या काही संस्थाचा समावेश करावा, RTE ॲक्ट ची अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणी, खाजगी शाळेत फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला अडवून ठेवणे यासंबंधी योग्य ते पाऊल उचलण्या संबंधी चर्चा केली
बाल हक्क आयोगाच्या पुणे येथील सुनावणी वेळेस प्रलंबित पोद्दार इंटरनॅशनल शाळेसंबंधी प्रकरणात संबंधित पालकांना शाळेच्या मुख्याध्यापकांना व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून बैठक घेतली
महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाद्वारे पुणे येथील महात्मा गांधी प्रशिक्षण केंद्र, महिला व बाल विकास कार्यालय येथे आयोगाच्या सदस्यांसोबत पुणे विभागाच्या प्रलंबित प्रकरणांची सुनावणी आयोजित करण्यात आली.
नांदेड आणि महाराष्ट्रातील इतर भागांतील रुग्णालयात घडलेल्या दुर्देवी मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत बालकांचे वाडिया हॉस्पिटल येथे बालहक्कआयोग सचिव श्री. शिवराज पाटील ( भा. प्र. से.) यांच्यासोबत भेट देऊन पाहणी केली.
रस्त्यावरील मुलांसाठी कार्य करणाऱ्या सलाम बालक ट्रस्ट च्या संस्थापक झरीन गुप्ता यांनी माझी भेट घेऊन मुंबई मधील रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी व सुरक्षितेसाठी चर्चा केली.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आज महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास विभाग, UNICEF India यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल स्नेही पुरस्कार २०२३ पार पडला. यावेळेस प्रमुख उपस्थिती म्हणून महिला व बाल विकास मंत्री मा. ना. Aditi Tatkare, विरोधी पक्षनेता मा. श्री.Vijay Wadettiwar, महिला व बाल विकास आयुक्त डॉ. श्री. प्रशांत नारनवरे, विशेष पोलीस महानिरीक्षक (महिला व अत्याचार) श्री. दीपक पांडे, बचपन बचाओ आंदोलनाच्या संचालिका संपूर्ण बेहरुआ हजर होते. बालकांच्या संरक्षणासाठी विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आज शालेय शिक्षण विभाग मंत्री मा. ना. श्री. दिपक केसरकर यांच्या सोबत बैठक संपन्न झाली. अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीत राज्यातील सर्व शाळांतील मुला मुलींच्या सुरक्षितेसाठी वातावरण निर्मितीसाठी सखी सावित्री समिती गठण करणे बाबत चर्चा झाली. तसेच चिराग ॲप चा प्रचार प्रसार करण्यासाठी जनजागृती करण्यासंबंधी सूचना मंत्री महोदय यांनी संबंधितांना दिल्या.
नागपूर दौऱ्याच्या अनुषंगाने काटोल रोड, नागपूर येथील मुलींच्या शासकीय बालगृहात भेट दिली, या वसतिगृहात मुलींच्या सर्वांगीण विकासाकरिता राबविण्यात येणारे उपक्रम आणि गतिमंद मुलींची घेण्यात येणारी काळजी निश्चितच उल्लेखनीय आहे. माझ्या सदर संस्थेला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने नाशिक येथील पोक्सो व बाल न्याय अधिनियम(जे.जे. ॲक्ट) कायद्याअंतर्गत नाशिक विभागातील प्रकरणांबाबत पुनरावलोकन बैठक आयोजित केली होती.