चाइल्ड लाइन टोल फ्री नंबर : १०९८ 

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे दि. १४  सप्टेंबर, २०२३ रोजी जिल्हाधिकारी पुणे यांचे सभागृह, येथे आयोजित पुणे विभागाच्या प्रलंबित प्रकरणाच्या सुनावण्या प्रशासकीय व अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. पुढील स्थळ, दिनांक व वेळ नंतर कळविण्यात येईल

०२२-२४९२०८९७/९५/९४

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग

(महाराष्ट्र शासन )

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिर सद्य:स्थितीत अनेक साथीच्या आजारामुळे जनसामान्यांमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेषतः महिला व बालक यांमध्ये आजाराचे प्रमाण जास्त आढळून येत आहे. सद्य:स्थितीत गोवर या आजारामुळे अनेक बालकांचा मुंबई व राज्यात मृत्यू झालेला असून आजही या आजारामुळे अनेक बालके मुंबई शहरात ग्रासलेली आहेत. या कारणास्तव महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगा कडून डी-वार्ड विभागातील बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या आरोग्य विभागासमवेत महिला व बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर लसीकरण दिनांक २४ डिसेंबर, २०२२ रोजी आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरास सुमारे ५०० महिला व बालकांनी सदर शिबिराचा लाभ घेतला. सदर शिबिरासाठी बालक व महिलांना मोफत लसीकरण, वैद्यकीय तपासणी, मलेरिया, टी.बी. यांची तपासणी, दातांची तपासणी व महिला व बालकांसाठी मोफत औषध उपचार या सेवा देण्यात आल्या.